Rashmi Mane
महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या आर्थिक मदतीसाठी ही योजना सुरु करण्यात आली असली, तरी हप्त्याच्या वेळापत्रकाबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
योजनेनुसार दर महिन्याला महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हप्ता वेळेवर न मिळता तो पुढील महिन्यात जमा होतो.
ऑगस्ट महिना आता संपत आला, पण अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यावेळीही हप्ता लांबणीवर जाऊ शकतो का असा सवाल महिलांच्या मनात आहे.
पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत असल्याने, याच पार्श्वभूमीवर महिलांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. काहींच्या मते, ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता मिळून 3000 रुपये थेट खात्यात जमा होऊ शकतात.
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शासन स्तरावरून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.