Rashmi Mane
केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. सध्याच्या तुलनेत पगारात चांगलीच उसळी अपेक्षित आहे.
हे सुधारित वेतन केंद्र सरकारच्या सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. त्याचबरोबर 65 लाख पेंशनधारकांचाही पेंशनमध्ये मोठा वाढ होणार आहे.
दिल्ली सरकारचे कर्मचारीही या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन वाढीचा लाभ घेणार आहेत.
7व्या आयोगाने बेसिक पगार 7,000 वरून 17,990 केला होता. आता 8व्या आयोगामुळे किमान बेसिक पगार 26,000 ते 34,650 पर्यंत जाऊ शकतो.
पेंशनधारकांची पेंशन सरासरी 8,000 ते 9,000 रुपयांनी वाढू शकते. नव्या शिफारशींमुळे सन्मानपूर्वक निवृत्ती जीवन शक्य होणार.
कर्मचारी संघटनांकडून 180 टक्के वेतनवाढीची जोरदार मागणी. आयोग कोणता फॉर्म्युला वापरणार हे महत्त्वाचे ठरणार!
8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2026 च्या सुरुवातीलाच लागू होण्याची शक्यता आहे.