RBI Decision : RBI चा भन्नाट निर्णय! फाटलेल्या नोटांतून नवा प्रयोग, पर्यावरण रक्षणासाठी मोठं पाऊल

Rashmi Mane

RBI ची नवा निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जुन्या आणि फाटलेल्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता त्या फेकून दिल्या जाणार नाहीत, तर वापरल्या जातील!

RBI waste notes recycling | Sarkarnama

दरवर्षी तयार होतात 15,000 टन नोटांचे ब्रिकेट्स

भारतात दरवर्षी सुमारे 15,000 टन ‘करन्सी ब्रिकेट्स’ तयार होतात – म्हणजे जुन्या नोटांचे दाबून केलेले तुकडे.

RBI waste notes recycling | Sarkarnama

आतापर्यंत काय व्हायचं या ब्रिकेट्सचं?

हे ब्रिकेट्स लँडफिलमध्ये टाकले जात किंवा जाळले जात – जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे.

RBI waste notes recycling | Sarkarnama

जुन्या नोटांमुळे नक्की धोका काय?

या नोटांमध्ये रसायनं, स्पेशल शाई आणि सेक्युरिटी थ्रेड्स असतात – जे जमिनीत टाकल्यास किंवा जाळल्यास माती, पाणी आणि हवेला हानी होऊ शकते.

RBI waste notes recycling | Sarkarnama

या नोटांचा वेगळ्या पद्धतीने वापर

RBI ने Institute of Wood Science and Technology सोबत मिळून अभ्यास केला. "या ब्रिकेट्सचा वापर लाकडाच्या कणांसारखा (particle) करता येईल का?"

RBI waste notes recycling | Sarkarnama

संशोधनात काय आढळलं?

ब्रिकेट्सपासून तयार केलेले पार्टिकल बोर्ड हे मजबुती, टिकाऊपणा आणि वापराच्या मानकांमध्ये उत्तम ठरले.

RBI waste notes recycling | Sarkarnama

याचा उपयोग कुठे होईल?

त्यामुळे हे बोर्ड फर्निचर, इंटेरिअर डिझाइन आणि आवाज थांबवणाऱ्या पॅनल्ससाठी वापरले जातील.

RBI waste notes recycling | Sarkarnama

पुढचं पाऊल – कंपन्यांची नोंदणी सुरू

RBI आता अशा कंपन्यांची नोंदणी करत आहे ज्या हे ब्रिकेट्स खरेदी करून पर्यावरणपूरक बोर्ड तयार करतील.

RBI waste notes recycling | Sarkarnama

Next : दोन वेळा यूपीएससी, दोनदा यश; गरिमा अग्रवाल यांचा यशाचा 'फॉर्म्युला' 

येथे क्लिक करा