Rashmi Mane
सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची मोठी अपेक्षा होती, पण आता ही आशा धूसर झाली आहे. सरकारकडून अजूनही शर्तींची रूपरेषा जाहीर नाही… काय आहे संपूर्ण अपडेट? जाणून घ्या नेमकं काय घडतंय...
7व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती की 2024 मध्ये नवीन आयोग जाहीर होईल. महागाई आणि जीवनमान वाढल्याने ही गरज वाटत होती.
8व्या वेतन आयोगासाठी सरकारने जानेवारीत घोषणा केली होती, पण 166 दिवस उलटूनही ToR नाही.
निवृत्त कर्मचाऱ्यांनाही 8व्या आयोगाची अपेक्षा होती, कारण यामुळे त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार होती. मात्र, ToR जाहीर न झाल्यामुळे 2026–27 च्या अगोदर शिफारसी लागू होणे कठीण.
16–20 महिन्यांची गरज रिपोर्टसाठी. पूर्वीच्या आयोगांप्रमाणे रिपोर्ट तयार होण्यासाठी लागतो दीर्घ कालावधी आणि नंतर सरकारची मंजुरीही आवश्यक.
सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या 8वा वेतन आयोग राबवण्याचा कोणताही विचार नाही
7व्या वेतन आयोगात ToR फक्त 156 दिवसांत. यावेळी मात्र 166 दिवसानंतरही कोणतीही गती नाही; त्यामुळे नाराजी निर्माण.
कर्मचारी संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि काही संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.