सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी गेल्या आठवड्यात 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे.
1 जानेवारी 2026 पासून 8 वा वेतन आयोग लागू होणार आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांचे सुधारित वेतन फेब्रुवारी 2026 पासून मिळण्यास सुरुवात होईल, असं म्हटलं आहे.
8 व्या वेतन आयोगाचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच सुमारे 65 लाख पेंशनधारकांच्या पेंशनमध्येही वाढ होणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतन 7 हजारवरून 17 हजार 990 इतके निश्चित करण्यात आले होते. हाच फॉर्म्युला ग्रहित धरला तर आठव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे कमीत कमी बेसिक वेतन 26 हजार होऊ शकते.
आठव्या वेतन आयोगात किमान वेतन वाढून 34 हजार 650 रुपये केले जाऊ शकते. तर पेंशन 9 हजारांनी वाढून 17 हजार 280 रुपये वाढ होऊ शकतो. हा केवळ अंदाज आहे.
केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना 1947 ला करण्यात आली.
कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे धोरण लागू करण्यात आले होते. यामध्ये किमान वेतन दरमहा 55 रुपये ठेवण्यात आले होते.