Mangesh Mahale
आठव्या वेतन आयोगासाठी स्थापन केलेल्या समितीला १८ महिन्यात रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. रिपोर्ट वेळेवर आला तर पगार आणि पेन्शनमध्ये वाढ लवकरच होईल.
आठवा वेतन आयोग हा १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. पगारवाढ येण्यासाठी उशिर होऊ शकतो. यामध्ये काही महिन्यानंतर एरियर दिला जाईल.
आयोगात न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या अध्यक्ष असणार आहे. प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य तर पंकज जैन हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
पगार आणि पेन्शन किती वाढणार असा प्रश्न विचारला जात आहे. मागील ट्रेंडनुसार पगार आणि पेन्शनमध्ये ३० ते ३४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. आठव्या आयोगात फिटमेंट फॅक्टर २.८६ होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होणार आहे. बेसिक सॅलरीत वाढ झाल्यावर इतर भत्तेदेखील वाढणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे.
पगारवाढ ही १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. अहवाल येण्यापूर्वी तसेच नवीन पगारवाढीची अंबलबजावणी होईपर्यंतच्या महिन्याचे एरियर दिला जाणार आहे.