Aslam Shanedivan
आठव्या केंद्रीय वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या असून यामुळे सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळू शकतो.
कर्मचारी संघटनांनी बेसिक पेन्शन वाढवण्याची मोठी मागणी करत ती 67 टक्के इतकी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच वयानुसार पेन्शनमध्ये अतिरिक्त लाभ द्यावा, अशी देखील मागणी करण्यात आली आहे. ही वाढ 65 वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने सुचवण्यात आली आहे.
पेन्शनचा कम्यूटेशन कालावधी सध्या 15 वर्षांचा असून तो कमी करून 10 ते 12 वर्षांपर्यंत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि फॅमिली पेन्शन यांचे स्पष्टपणे पुनरीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाढती महागाई लक्षात घेता DR व्यवस्थेचा आढावा घेऊन मिळणारे लाभ आणि महागाई भत्ता यांचे अधिक प्रभावी एकत्रीकरण करावे.
पेन्शनर्ससाठी ग्रेच्युटीची कमाल मर्यादा वाढवण्याबरोबरच फॅमिली पेन्शनची व्याप्तीही वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना OPS, UPS किंवा NPS यापैकी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय द्यावा, अशी महत्त्वाची मागणी आहे.