मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारली बाप्पाची मूर्ती; पाहा PHOTO

Rashmi Mane

मुख्यमंत्र्यांनी साकारला बाप्पा

गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबईत महा गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

शाडू मातीपासून मूर्ती

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या कार्यशाळेत फडणवीस यांनी स्वतःच्या हातांनी शाडू मातीपासून गणरायाची मूर्ती साकारली.

फेटा, टीळा अन् हातात वीणा

मुख्यमंत्र्यांनी घडवलेल्या बाप्पाच्या मूर्तीला डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा आणि हातात मोदक असा सुंदर साज घडवण्यात आला आहे.

ढोल-ताशांच्या गजरात उत्साह

ढोल-ताशांच्या मंगल गजरात आणि मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.

विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

या कार्यशाळेत 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती साकारल्याने या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे फडणवीस म्हणाले.

वाशीमध्ये रंगला अनोखा उपक्रम

वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा उपक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाप्पाची मूर्ती घडवल्याने कार्यशाळेला विशेष आकर्षण मिळाले.

Next : रॉयल लूक अन् जबरदस्त कॉन्फिडन्स! महाडिकांच्या थोरल्या सुनेच्या ‘स्टायलिश लूक’ची इंटरनेटवर तुफान चर्चा!!

येथे क्लिक करा