Rashmi Mane
तर मग PF अकाउंटमध्ये खरंच पैसे जमा होत आहेत की नाही, हे वेळोवेळी तपासणे खूप गरजेचं आहे.
PF अकाउंटचं बॅलन्स तपासण्यासाठी EPFO च्या वेबसाइटवर लॉग-इन करण्याची गरज नाही. आता हे काम फक्त एक कॉल किंवा SMS करून शक्य आहे.
तुम्हाला 9966044425 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल.
कॉल दोनदा वाजल्यानंतर आपोआप कट होईल आणि लगेच तुम्हाला SMS वर तुमच्या PF अकाउंट बॅलन्सची माहिती मिळेल.
मोबाईलच्या मेसेज अॅपमध्ये "EPFOHO UAN <तुमचा UAN नंबर>" लिहा आणि 7738299899 या नंबरवर SMS पाठवा.
SMS द्वारे काही क्षणातच तुम्हाला तुमच्या PF बॅलन्सची डिटेल मिळेल. लक्षात ठेवा: EPFOHO आणि UAN यामध्ये एक स्पेस द्यावी लागते.
तुमचा UAN बँक अकाउंट, आधार किंवा PAN सोबत लिंक असावा. तुमचा मोबाईल नंबर UAN सोबत रजिस्टर व अॅक्टिव्हेट असावा.
उदाहरण: जर तुम्हाला माहिती तेलुगु भाषेत हवी असेल तर "EPFOHO UAN TEL" असा SMS पाठवा.