Aslam Shanedivan
देशासह जगाला हादरवून सोडणारा दहशतवादी हल्ला २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला झाला होता.
त्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले होते. ज्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवीत दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते.
या कारवाईत भारतीय लष्कराच्या अत्यंत अचूक आणि प्रभावी कारवाईने पाकिस्तानला युद्धातून माघार घ्यावी लागली. मात्र भारतीय लष्कराने सीमा सोडली नव्हती.
त्यावेळी तणाव निर्माण झाला होता यावेळी शत्रूंशी लढणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या मदतीसाठी १० वर्षांच्या चिमुकल्याने धाव घेतली. ज्याचे नाव श्रवण सिंग असे आहे.
इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या श्रवण सिंह पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील ममदोतचा रहिवासी असून त्याचे गाव आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे.
त्याने अतिशय रखरखत्या उन्हात आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारातही श्रवण भारतीय सैनिकांसाठी पाणी, चहा, दूध, लस्सी आणि बर्फ असे पोच करायचा.
त्याचे हे शौर्य आणि हिंमत पाहून भारतीय जवानांनी त्याला ऑपरेशन सिंदूरचा सर्वांत लहान योद्धा, अशी उपमा दिलीय.
आता त्याच्या या कार्याची दखल घेत शौर्य आणि देशभक्तीचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला असून त्याला ‘प्रधानमंत्री बाल पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले आहे.