Aslam Shanedivan
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री दीपक जोशी यांनी चौथे लग्न केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
63 वर्षीय भाजप नेते जोशी यांनी आपल्या पेक्षा 18 वर्षांनी लहान असणाऱ्या काँग्रेस नेत्या पल्लवी सक्सेना (वय-45) यांच्यासोबत लग्न केलं आहे.
जोशी यांनी पल्लवी सक्सेना यांच्याशी ४ डिसेंबर रोजी आर्य समाजाच्या पद्धतीने विवाहगाठ बांधली आहे.
पण आता यांचे लग्न वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच दोन महिला समोर आल्या आहेत.
या दोन्ही महिलांनी आपण दीपक जोशी यांच्या पत्नी असल्याचा दावा त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
यातील एकीने आपण त्यांच्या दुसरी पत्नी असल्याचा दावा केला असून विविह 2016 मध्ये झाल्याचे म्हटलं आहे
तर दुसऱ्या महिलेनं तिसरी पत्नी असल्याचा दावा करत हे लग्न २१ जानेवारीला झाल्याचे म्हटलं आहे. यानंतर आता चौथे लग्नही झाल्याने हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे
दरम्यान या दोन्ही लग्नाबद्दल आपल्याला आधी काहीच माहिती नसल्याचे म्हणत जोशी मागील वर्षभरापासून त्यांच्यासोबत असून ते एकत्र राहत असल्याचे पल्लवी सक्सेना यांनी म्हटलं आहे.