Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत धडाकेबाज निर्णय

Amol Sutar

राज्य मंत्रिमंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि.14)  मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत.

CM Eknath Shinde | Sarkarnama

बैठक

मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Devendra Fadnavis, Ajit Pawar | Sarkarnama

ग्राम सडक

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त 7 हजार किलोमीटरचे रस्ते व पुलाची कामे करण्यात येणार आहेत.

MukhyaMantri Gram Sadak Yojana | Sarkarnama

रेती धोरण

ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार आहेत.

Reti Dhoran | Sarkarnama

वैद्यकीय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करुन दरमहा 18 हजार रुपये केली आहे. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारणार आहेत.

Medical | Sarkarnama

प्रोत्साहन

उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 टक्के मुद्रांक शुल्क सवलत दिली जाणार आहे.

Industries | Sarkarnama

शिष्यवृत्ती

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.

Scholarship | Sarkarnama

पुनर्विकास

सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. हा विकास म्हाडा करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

MHADA | Sarkarnama

समाजकार्य

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करुन आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Social | Sarkarnama

NEXT : Lok Sabha : शत्रुघ्न सिन्हा, सनी देओलसह 9 खासदार लोकसभेत 'खामोश'

येथे क्लिक करा