'कट्टर दहशतवाद्यांकडून लवकरच तुमची हत्या...'; पंतप्रधान मोदींच्या 'हनुमान'ला पत्राद्वारे दिली धमकी

Deepak Kulkarni

तरुण मंत्री

मोदी सरकारमधील तरुण मंत्री म्हणून चिराग पासवान यांच्याकडे पाहिले जाते.

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

राष्ट्रीय अध्यक्ष

हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान तुफान चर्चेत आहेत.

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

जन्म आणि शिक्षण

चिराग पासवान यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1982 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांनी कंप्यूटर सायन्समधून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. फॅशन डिझायनिंगचा कोर्सही त्यांनी केला आहे

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

'मोदींचे हनुमान'

राजकारणात आणि प्रसारमाध्यमांमध्ये 'मोदींचे हनुमान' हा शब्दप्रयोग मुख्यत्वे चिराग पासवान यांच्यासाठी वापरला जातो. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी स्वतःला पंतप्रधान मोदींचे 'हनुमान' म्हटले होते.

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

बॉलिवूडमध्ये अभिनय...

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी चिराग यांनी बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. पण अभिनय विश्वात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. खासदार व अभिनेत्री कंगना रनौत सोबत त्यांनी चित्रपटही केला होता.

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

कॅबिनेट मंत्री

बिहारच्या राजकारणात चिराग यांनी प्रवेश केल्यानंतर ते 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये पुन्हा एकदा खासदार बनले आहेत. ते सध्या मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

जीवे मारण्याची धमकी

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून राजकारणात खळबळ उडाली आहे. सुरक्षेसंबंधी चिंता वाढली आहे. 

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

गंभीर दखल

पासवान यांना ही धमकी पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेल्या पत्रातून देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. 

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

लवकरच तुमची हत्या

या पत्रात कट्टर दहशतवाद्यांकडून लवकरच तुमची हत्या करण्यात येणार आहे, असा मजकूर आहे. या धमकीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. 

Union Minister Chirag Paswan | Sarkarnama

NEXT: 12 वर्षांतील 6 कुंभमेळ्यांवर 18 हजार कोटी खर्च; यंदा नाशिकमध्ये किती?

Nashik Kumbh Mela 2027 | Sarkarnama
येथे क्लिक करा...