Rashmi Mane
आज नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या नव्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेनचे आज उद्घाटन होत असून महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही एक मोठी आनंदवार्ता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेसेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या नव्या गाडीतून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांचा अनुभव मिळणार आहे.
नांदेड हे शीख धर्मातील पाच तख्तांपैकी एक असलेल्या ‘हजूर साहिब’मुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. या गाडीमुळे देशभरातील शीख भाविकांना हजूर साहिब येथे पोहोचणे सोपे होणार आहे.
महाराष्ट्र सिख असोसिएशनने या गाडीच्या मागणीसाठी दीर्घकाळ पाठपुरावा केला होता, जो अखेर पूर्ण झाला आहे.
नांदेडहून सकाळी 11.20 वाजता सुटेल आणि रात्री 9.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. या प्रवासात परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या प्रमुख स्थानकांवर थांबा असेल.
नियमित सेवा 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून ट्रेन क्रमांक 20705 नांदेडहून सकाळी 5 वाजता सुटेल आणि दुपारी 2.25 वाजता मुंबईला पोहोचेल.
नियमित सेवा 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून ट्रेन क्रमांक 20705 नांदेडहून सकाळी 5 वाजता सुटेल आणि दुपारी 2.25 वाजता मुंबईला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 20706 मुंबई सीएसएमटीहून दुपारी 1.10 वाजता सुटेल व रात्री 10.50 वाजता नांदेडला पोहोचेल.