Rashmi Mane
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत ओबीसी, विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहेत.
या योजनांचा उद्देश विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे, आर्थिक अडचणींवर मात करून त्यांना यश मिळवून देणे हा आहे.
कर्मचारी निवड आयोग (SSC-CGL), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES), आयबीपीएस-पीओ, बँकिंग, एलआयसी, रेल्वे आणि एएओ अशा अनेक परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब्लेट योजना देखील चर्चेत असून लवकरच तिची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळावा हा यामागील हेतू आहे.
महाज्योतीच्या योजनेत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी दरमहा 37,000 रुपयांपर्यंत अधिछात्रवृत्ती, तसेच जेईई, नीट व एमएचटी-सीईटीसाठी मोफत प्रशिक्षणाचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना टॅब्लेट, इंटरनेट डेटा आणि अभ्यास साहित्यही मोफत देण्यात येणार आहे.
या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आणि नॉन-क्रीमी लेयर प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करण्यात येईल.