Hrishikesh Nalagune
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2025-26चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.
यावेळी अजित पवार यांचा काहीसा काव्यात्मक अंदाज बघायला मिळाला.
सुरुवातीलाच अजितदादांनी कविता म्हणून लाडक्या बहिणींचे आभार मानले.
लाडक्या बहिणी मिळाल्या अन् आम्ही धन्य झालो,
बारा कोटी प्रियजणांना मान्य झालो
विकासाची केली कामे म्हणून
आम्ही पुन्हा आलो… पुन्हा आलो…
काळी माती ज्याची शान
तिच्यात राबे विसरूनी भान
पोशिंदा हा आहे आपला
कृतज्ञेने ठेवू जाण
देऊ योजना आशा तया की
राहील त्याचे हिरवे रान
भावफुलांना पायी उधळून
आयुष्याचा कापूर जाळुन
तुझे सारखे करीन पूजन,
गीत तुझे मी आई गाईन
शब्दोशब्दी अमृत ओतून
'का सत्ता आम्हास मिळाली, त्याची जाण आहे,
करायचे काय याचे भान आहे.
साथ द्या आम्हास नेवू राज्य पुढती,
उंची न्यावयाची शान आहे'
अखेरीस अजितदादांनी "महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही..." असे सांगितले.