सरकारनामा ब्यूरो
अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 या वर्षाचा 11 वा अर्थसंकल्प सादर केला यात मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांमध्ये राज्य सरकारकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याबाबत घोषणा करण्यात आल्या आहेत.
मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना प्रदुषणमुक्त, विनाअडथळ्याशिवाय वाहतूकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरु होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले
मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या 10 लाख इतकी वाढली आहे. यामुळे मेट्रोच्या गतीला आणखी चालना मिळण्यासाठी विकास कामात वाढ करण्यात येत आहे.
2025-26 या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याचे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.
येत्या 5 वर्षांत राज्यात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे
नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम सुरु आहे.
ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज मार्गला प्रकल्पास केंद्र सरकारची मान्यता मिळाली.
पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-२ अंतर्गत खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी आणि नळ स्टॉप वारजे -माणिकबाग या दोन मार्गाचा 9 हजार 897 कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.