Rashmi Mane
काळीभोर मिशी, धारदार नजर आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाची चमक अजित पवार यांच्या तिशीतील या फोटोंमध्ये एक वेगळाच करिष्मा अन् अफाट ताकद असलेला माणूस...
राजकारणात नव्याने उभारी घेत असतानाचा हा काळ. तरुण वयातच जबाबदारी स्वीकारणारा, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेता म्हणून उदयास आला.
सभांमधील आत्मविश्वास, भाषणावरची पकड आणि प्रश्नांची सखोल तयारी तसचं अजितदादांचा प्रशासनावरही प्रभाव होता.
कार्यकर्त्यांमध्ये मिसळणं, थेट संवाद आणि रोखठोक बोलणं—हा स्वभाव त्या दिवसांपासूनच त्यांच्यासोबत आहे.
दादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य माणसाशी नातं जपणारा नेता म्हणून त्यांनी वेगळी छाप पाडली.
त्याच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत केवळ राजकारणी नाही, तर मेहनती, शिस्तप्रिय आणि ध्येयवेडा नेता पहायला मिळाला.
हे फक्त फोटो नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात घडून गेलेल्या एका मजबूत नेतृत्वाची साक्ष आहेत.
आमदारकीपासून ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा केवळ वारसा नव्हता, तर मेहनतीचा परिणाम होता.