Rashmi Mane
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत.
अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्य हादरले असून अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत तसेच बारामतीमधील वातावरण शोकाकूल झाले आहे.
आजची सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीसाठी खाजगी विमानाने रवाना झाले होते. सकाळी 8.50 च्या सुमारास ही भीषण घटना घडली.
बारामतीत लँडिंगवेळी काळाचा घाला! मुंबईहून निघालेले VSR कंपनीचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना कोसळले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.
5 जणांचा दुर्दैवी मृत्यू! या भीषण अपघातात विमानातील एकूण 5 जणांचा समावेश होता. दुर्दैवाने, या सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातास्थळी विमानाचे अवशेष विखुरलेले असून, सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे आणि धुराचे लोट दिसत आहेत. ही दृश्ये काळजाचा थरकाप उडवणारी आहेत.
मुंबई पोलीस सन 2009 बॅच पोलीस शिपाई विदिप जाधव यांचा आज सकाळी DCM अजित पवार यांचे PSO कर्तव्य बजावत असताना विमान अपघात त्यांचाही अंत झाला.
एक धडाडीचे नेतृत्व हरपले! अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.