Rashmi Mane
केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत ‘प्रधानमंत्री धन-धन्य कृषी योजना’ला मंजुरी मिळाली आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार! शेतीला नवी दिशा देणारी महत्वाकांक्षी योजना सुरू!
देशभरातील 100 जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. जेथे पीक उत्पादकता कमी, कर्ज उपलब्धता मर्यादित आहे.
आर्थिक वर्ष 2025 च्या अर्थसंकल्पात जाहीर विविध 36 शेती योजनांचे एकत्रिकरण. तांत्रिक, आर्थिक आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून सशक्त धोरण तयार!
हवामान-लवचिक शेती, अचूक शेती, पीक विविधीकरण, पाण्याची कार्यक्षमता – या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यावर भर!
दर्जेदार बियाणे, आधुनिक अवजारे, प्रगत तंत्रज्ञानासाठी कर्जपुरवठा. अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्जाची तरतूद!
पंचायत, जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर गोदामे, साठवणूक केंद्रे, पुरवठा साखळी यांचा विकास. नाशवंत पिकांचा अपव्यय कमी करण्याचा प्रयत्न.
महिला शेतकरी, स्वयंसहायता गट, एफपीओ आणि अॅग्री-टेक स्टार्टअप्स यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना!
शाश्वत शेती प्रणाली, हवामान अनुकूल पीक नियोजन, आधुनिक सिंचन प्रणाली यांचा वापर करून उत्पादनात स्थिरता साधण्यावर भर.