खरंच ATMमधून 500 च्या नोटा हटणार? जाणून घ्या, व्हायरल मेसेज मागचं सत्य

Rashmi Mane

500 च्या नोटा बंद होणार? व्हायरल मेसेजने खळबळ!

सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जातोय की 500 च्या नोटा सप्टेंबर 2025 नंतर एटीएममधून मिळणार नाहीत. लोकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

व्हायरल पोस्ट

या फेक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, RBI ने बँकांना आदेश दिले आहेत, की 30 सप्टेंबर 2025 नंतर ATM मधून 500 च्या नोटा देऊ नयेत आणि फक्त 100 आणि 200 च्याच नोटा वितरित कराव्यात.

सरकारनं घेतली तात्काळ दखल

या पोस्टमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकारनं लगेच पाऊल उचललं आहे.

PIB ने केला दावा फेटाळून

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने स्पष्टपणे सांगितले की हा मेसेज पूर्णतः फेक आहे. RBI ने असा कुठलाही आदेश बँकांना दिलेला नाही.

500 च्या नोटा अजूनही वैध

PIB च्या म्हणण्यानुसार 500 च्या नोटा पूर्णतः वैध आहेत आणि त्यांचं चलनात वापर सुरूच राहणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही.

RBI चा खरा आदेश

RBI ने फक्त ATM मधील नोटांच्या संरचनेत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ATM मध्ये 75% नोटा या 100 आणि 200 रुपयांच्या असाव्यात.

पुढील टप्पा – मार्च 2026

RBI च्या योजनेनुसार 31 मार्च 2026 पर्यंत ATM मधील लहान नोटांची टक्केवारी 90% पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामागचा उद्देश – सुट्या पैशांचा तुटवडा कमी करणे.

Next : 24 तासांत ITR रिफंड, आजच करा फाईल! उद्या खात्यात पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

येथे क्लिक करा