Talathi Bharti : विखे-थोरात-पवारांमध्ये वाक् युद्ध...

Pradeep Pendhare

मंत्री विखे म्हणाले

तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचे सिद्ध करा, नाहीतर राजकारणातून सन्यास घ्या, असे आव्हान मंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरातांना दिले.

Radhakrishna Vikhe | Sarkarnama

पवारांना कारवाई इशारा

आमदार रोहित पवार यांनी भरतीत आर्थिक देवाण-घेवाण झाल्याच्या आरोपावर मंत्री विखे यांनी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचा इशारा दिला आहे.

Radhakrishna Vikhe | Sarkarnama

तलाठ्यांची नियुक्ती

महसूल पंधरवाड्यानिमित्तानं राज्यात ४ हजार नवनियुक्ती तलाठ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले.

Radhakrishna Vikhe | Sarkarnama

थोरातांचे प्रतिआव्हान

तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आली, तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी मंत्री विखेंना प्रतिआव्हान दिले.

Balasaheb Thorat | Sarkarnama

गोपनीय अहवाल

तलाठी भरतीमधील गैरप्रकारांचा अहवाल अपल्याच अख्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना दिल्याची आठवण थोरात यांनी विखेंना करून दिली.

Balasaheb Thorat | Sarkarnama

सत्य लपणार नाही

तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले, तरी बदलणार नाही, असे थोरात यांनी मंत्री विखे यांना सुनावले.

Balasaheb Thorat | Sarkarnama

आमदार पवारांकडून आठवण

तलाठी भरतीमधील गैरप्रकाराची गोपनीय अहवालाची फाइल पाठवून दिल्याची आठवण आमदार रोहित पवार यांनी मंत्री विखेंना करून दिली.

Rohit Pawar | Sarkarnama

स्पष्टीकरण देण्याचे आव्हान

ही गोपनीय फाईल सार्वजनिक करून त्यावर स्पष्टीकरण देण्याची हिंमत मंत्री राधाकृष्ण विखेंनी दाखवावी, असे आव्हान आमदार रोहित पवार यांनी केले.

Rohit Pawar | Sarkarnama

NEXT : एच. डी. देवेगौडा यांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, पंतप्रधान संग्राहलाही दिली भेट; पहा PHOTOS

येथे क्लिक करा :