सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्र सरकारने आधार कार्ड आधारे बनलेली जन्म प्रमाणपत्रे रद्द होणार आहेत. तसेच आधार आता अधिकृत दस्तऐवज म्हणूनही ग्राह्य धरले जाणार नाही.
आधार कार्ड प्रत्येकाचे अधिकृत ओळखपत्र बनले आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ऑगस्ट 2023 मधील कायदा सुधारणा लागू झाल्यानंतर फक्त आधार कार्डाच्या आधारे तयार केलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांत अनेक बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याची तक्रार वाढली होती.
अनेक फसवणूक प्रकरणांमुळे अवैध काम रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
महसुल विभागाने सर्व तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना 16 मुद्यांचे व्हेरिफिकेशन गाईडलाइन्स पाठवले आहेत.
कागदपत्रांमध्ये कुठलीही तफावत आढळली तर थेट FIR दाखल होणार, अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
एखाद्याने जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर जन्म दाखला मिळणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे.