Aadhaar Card News Update : आधार कार्ड अपडेट करायचंय? 'या' ॲपमुळे घरबसल्या होणार सगळं काम! आजचं करा डाउनलोड!

Rashmi Mane

डिजिटल युग

आजच्या डिजिटल युगात, आधार कार्ड हे बँकिंगपासून ते सरकारी योजनांच्या लाभांपर्यंत सर्वत्र आपली 'डिजिटल ओळख' बनले आहे.

मोठी अडचण

परंतु, जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा जन्मतारीख यांसारख्या माहितीत काही चूक असेल, तर यामुळे मोठी अडचण येऊ शकते.

महत्त्वपूर्ण सुविधा

ही समस्या दूर करण्यासाठी, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने एक नवे आधार ॲप सादर केले आहे, जे नागरिकांना अनेक नवीन आणि महत्त्वपूर्ण सुविधा पुरवेल.

आता काही क्लिकमध्ये

आधार सेवा केंद्राबाहेरच्या लांब रांगा, केंद्रावर जाण्याची कटकट आणि कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आता इतिहासजमा होणार आहे. या नव्या ॲपमुळे तुम्ही घरबसल्या, अगदी सहजपणे आणि सुरक्षित मार्गाने तुमचा आधार डेटा अपडेट करू शकाल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या ॲपमध्ये क्यूआर कोड, फेस-आयडी (चेहरा ओळख) आणि डिजिटल कागदपत्र अपलोड करण्यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

नवे e-Aadhaar ॲप कशासाठी?

UIDAI ने स्पष्ट केले आहे की, या e-Aadhaar ॲपचा मुख्य उद्देश आधार कार्डमधील जनसांख्यिकीय (Demographic) माहिती (जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर) अद्ययावत करणे सोपे करणे आहे.

नव्या ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये

चेहरा स्कॅन (Face Scan): ॲपमध्ये लॉग-इन करणारी व्यक्ती खरी आहे हे सुनिश्चित करण्यासाठी ॲप आधी तुमचा चेहरा स्कॅन करेल.

क्यूआर कोड शेअरिंग

जेव्हा तुम्हाला तुमची ओळख कोणाशी शेअर करायची असेल, तेव्हा तुम्ही ॲपमधील क्यूआर कोड दाखवून किंवा स्कॅन करून ती करू शकता. विशेष म्हणजे, नाव आणि फोटोव्यतिरिक्त कोणती माहिती समोर यावी हे तुम्ही ठरवू शकता.


बायोमेट्रिक्स लॉक

अनधिकृत (Unauthorized) वापर थांबवण्यासाठी तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स (बोटांचे ठसे/बुब्बुळ) लॉक करू शकता.


Aadhar Card | Sarkarnama

Next : पेन्शन हवी? 30 नोव्हेंबर डेडलाईन; 'हे' काम न केल्यास बसू शकतो दणका! 

येथे क्लिक करा