Rashmi Mane
आज आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र राहिलेले नाही. हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. जे तुमची ओळख, पत्ता आणि बायोमेट्रिक माहिती सुरक्षित ठेवते आणि अनेक सरकारी आणि गैर-सरकारी सेवांसाठी ते आवश्यक बनले आहे.
फक्त ओळखपत्र नाही, आधार आहे तुमचा डिजिटल साथीदार! चला जाणून घेऊया त्याचे उपयोग.
DBT (Direct Benefit Transfer) आधार बँक खात्याशी लिंक असेल, तर गॅस सब्सिडी, शेतकरी निधी, रेशन यांसारख्या सरकारी मदतीची रक्कम थेट खात्यात जमा होते.
त्वरित ओळख पडताळणी. बँक खाते उघडणे, सिम खरेदी, डीमॅट अकाऊंट — हे सर्व e-KYC ने काही मिनिटांत शक्य!
आधार तुमच्या मोबाइलमध्ये mAadhaar अॅपद्वारे आधार लॉक/अनलॉक, QR कोड स्कॅन, अपडेट्स ट्रॅकिंग सहज करता येते.
Address Proof म्हणून मान्यता गॅस कनेक्शन, पासपोर्ट, शाळा-कॉलेज अॅडमिशन आधार सर्वत्र चालतो!
आधार + PAN लिंकिंग. आता आधार आणि पॅन लिंक असणे आवश्यक आहे. IT रिटर्नसाठी OTP लॉगिनसोबत सोपी प्रक्रिया.
घरबसल्या अपडेट करा माहिती. नाव, पत्ता, जन्मतारीख यासारखी माहिती UIDAI च्या वेबसाइटवरून सहज अपडेट करता येते.