Rashmi Mane
वैष्णवी हगवणे हिने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
कायद्यानुसार हुंडा मागणे, देणे किंवा घेणे गुन्हा आहे. तरी आजही अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी केली जाते.
हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांना आता कठोर शिक्षा होते. कायद्यातील महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
विवाहाच्या 7 वर्षांत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू व हुंड्याच्या छळाचे पुरावे सापडल्यास
किमान 7 वर्षे तुरुंगवास, अधिकतम आजीवन कारावास
कोणालाही आत्महत्येस प्रवृत्त केल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड.
जाणीवपूर्वक दुखापत केली तर 1 वर्ष कारावास किंवा 10,000 दंड किंवा दोन्ही
एखाद्याचा उद्देशपूर्वक अपमान करून त्याला प्रक्षोभित केले असेल. तर 2 वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही
पोलिस स्टेश, महिला आयोग, समाजकल्याण अधिकारी, वकील तत्काळ तक्रार करा. मुलीचा सन्मान करा हुंडा नाकारा. विवाहित महिलांवर अन्याय होणार नाही यासाठी आपली भूमिका ठाम असू द्या.