Jagdish Patil
UIDAI ने आधारवरील नाव दुरुस्ती आणि बदलाच्या नियमांत मोठे बदल केले आहेत.
UIDAI च्या नवीन SOP नुसार आता नावात किरकोळ सुधारणा करण्यासाठी विविध कागदपत्रं अनिवार्य असणार आहेत.
ओळखीमध्ये बदल न होता नावात किरकोळ दुरुस्तीसाठी ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.
18 वर्षांखालील मुलांसाठी कुटुंबप्रमुखाच्या आधारे नाव अपडेट करताना नातेसंबंधाचा पुरावा वापरता येईल.
आधार काढताना ऑपरेटरच्या चुकीमुळे नाव चुकीचे नोंदवले गेले असल्यास प्रक्रिया वेगळी असेल.
प्रौढांसाठी Annexure B मधील शपथपत्र, नातेसंबंधाचा पुरावा, तर अल्पवयीनांसाठी पालकांच्या Annexure C मधील शपथपत्रासह आवश्यक पुरावे लागतील.
लग्न, घटस्फोटानंतर आडनाव बदलणाऱ्या महिलांना Annexure D मधील शपथपत्रासोबत ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.
शपथपत्रामध्ये, नाव, आडनाव बदलाचा उद्देश विवाह, घटस्फोटाशी संबंधित असून मूळ ओळख बदलत नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.
तर कॅपिटल अक्षरांमधील त्रुटी किंवा पूर्णविराम हटवण्यासाठी पुराव्यांची गरज लागणार नाही.
नावात संपूर्ण बदल किंवा ज्यामुळे व्यक्तीची ओळखच बदलेल, अशा 'मेजर नेम चेंज'साठी शासकीय गॅझेट अनिवार्य.