Jagdish Patil
फ्लायदुबईच्या विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानी को-पायलटचं नाव हमाम अल-हम्ममी असल्याचं वृत्त सीएनएनने दिलंय.
अल-हम्ममीच्या कट्टर वैचारिक विचारांमुळे ओमानने त्याच्यावर हवाई प्रवासासंबंधी निर्बंध घातले होते.
तरीही फ्लायदुबईने त्याला नोकरी दिल्याची आणि त्याने ओमान एअरमध्ये जवळपास 7 वर्षे काम केले आहे.
हमाम हा ओमानी नागरिक आहे. त्याचा जन्म संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाला असून त्याचे वडील ओमानी, तर आई सीरियन आहे.
हमामच्या नावाने असलेल्या, पण आता डिलीट केलेल्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये त्याने ओमान एअरमध्ये सात वर्षे काम केल्याचे नमूद होते.
त्याने फेब्रुवारी 2025 मध्ये ओमान एअरमधील नोकरी सोडल्यानंतर रॉयल एअर मारोकमध्ये नोकरी स्वीकारली.
मात्र, जानेवारी 2026 मध्ये त्याने ही नोकरी सोडली. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हमामने फ्लायदुबईमध्ये केवळ 8 महिने काम केले होते.
लिंक्डइन प्रोफाइलमध्ये त्याने इंग्लंडमधील बकिंघमशायर न्यू युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतल्याचे नमूद होते.
एका वृत्तानुसार, 2024 मध्ये हमाम अल-हम्ममी ओमान एअरमध्ये प्रशिक्षणार्थी को-पायलट असताना त्याच्याकडे अतिरेकी साहित्य आढळले होते.
त्यानंतरही ओमान एअरने त्याला प्रशासकीय अधिकारी म्हणून कंपनीत कायम ठेवले होते.
तर सौदी अरेबियाने गुरुवारी हमाम याला संयुक्त अरब अमिरातीच्या ताब्यात दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.