पालकांनो आधार अपडेट करा, अन्यथा मुलांचे रेकॉर्ड येईल धोक्यात...

Ganesh Sonawane

वय ५ आणि १५ वर्षे महत्त्वाचे

मुलांचे वय ५ आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आधारमधील बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. याला ‘मॅडेटरी बायोमेट्रिक अपडेट’ (MBU) म्हटले जाते.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

नेमके काय अपडेट होते?

MBUमध्ये मुलांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र आधार नोंदणीत अद्ययावत केले जाते. यामुळे वयानुसार मुलांची ओळख माहिती आधार प्रणालीमध्ये अपडेट होते.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

अपडेट न केल्यास अडचणी

MBU वेळेत न केल्यास आधारशी संबंधित काही सेवांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आधारची स्थिती तपासणे गरजेचे आहे.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

शासकीय योजनांसाठी आधार महत्त्वाचा

अनेक शासकीय योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधांसाठी आधारचा वापर केला जातो. माहिती अद्ययावत नसल्यास संबंधित प्रक्रियांमध्ये अडथळे येऊ शकतात.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

MBU प्रलंबित आहे का तपासा

पालकांनी आपल्या मुलाचे MBU प्रलंबित आहे की नाही, हे तपासावे.
प्रलंबित असल्यास अधिकृत आधार नोंदणी किंवा अपडेट केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येते.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

मुलाला सोबत घेऊन जा

आधार अपडेटसाठी मुलाला सोबत घेऊन अधिकृत आधार नोंदणी किंवा अपडेट केंद्रावर जावे. तेथे आवश्यक बायोमेट्रिक माहिती, छायाचित्र आणि संबंधित नोंदी अपडेट केल्या जातील.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

अपडेटनंतर पावती जपून ठेवा

MBU प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणारी पावती जपून ठेवणे आवश्यक आहे.
त्यानंतर आधार अपडेटची स्थिती तपासावी.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

पालकांनी दुर्लक्ष करू नये

मुलांचे आधार वेळेत अपडेट करून आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे.
विशेषतः शासकीय योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधांसाठी याकडे दुर्लक्ष करू नये.

Aadhaar Update for Children ( MBU) | Sarkarnama

NEXT : सख्खे भाऊ मदत करेनात, जिद्दी मुलीनं थेट जिल्हाधिकाऱ्यांना बांधली राखी! काही तासांतच मिळालं मोठं गिफ्ट

Kanpur DM Jitendra Pratap Singh | Ishu | Sarkarnama
येथे क्लिक करा