सख्खे भाऊ मदत करेनात, जिद्दी मुलीनं थेट जिल्हाधिकाऱ्यांना बांधली राखी! काही तासांतच मिळालं मोठं गिफ्ट

Rajanand More

रक्षाबंधन

बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिणीने हातावर राखी बांधल्यानंतर भाऊ तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. एका जिल्हाधिकाऱ्यांच्या दातृत्वाने यंदाचे रक्षाबंधन ईशू या मुलीसाठी संस्मरणीय ठरले आहे.

Rakhi Celebraion | Sarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांना राखी

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ईशू नावाच्या बारावीत शिकणाऱ्या मुलीने नुकतीच जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांना राखी बांधली. सिंह यांनीही भावाचे कर्तव्य पार पाडत ईशूला खास गिफ्ट देत तिच्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला.

Kanpur DM Jitendra Pratap Singh | Sarkarnama

काय घडलं?

ईशूला शिक्षणाची खूप आवड. पण आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने अनेकदा अडथळे आले. आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. ईशूच्या वडिलांचे २०१७ मध्येच निधन झाले आहे.

Ishu | Sarkarnama

शाळेची फी थकली

मागील काही महिन्यांपासून ईशूच्या शाळेची फी थकली आहे. शाळेने तातडीने २९ हजार रुपये भरण्यास सांगितले होते. पैसे नसल्याने ती आणि आई हतबल झाली होती. तिला भाऊही मदत करत नव्हते.

School Girls | Sarkarnama

राखी बांधली

जिद्दी असलेल्या ईशूने थेट जिल्हाधिकारी सिंह यांचा जनता दरबार गाठला. तिथे आपले गाऱ्हाणे मांडत त्यांच्या हातावर राखाही बांधली.

Kanpur DM Jitendra Pratap Singh | Ishu | Sarkarnama

मोठं गिफ्ट

ईशूची शिकण्याची जिद्द पाहून सिंह यांनीही तिला लहान बहीण मानून मोठं गिफ्ट दिलं. तिच्या शाळेची अर्धी फी माफ करायला लावली अन् उरलेली फी स्वत: भरली.

Kanpur DM Jitendra Pratap Singh | Sarkarnama

सायकलही दिली

ईशूची शाळा घरापासून लांब असल्याने आणि पैसे नसल्याने ती पायी जात होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तिला शाळेत जाण्यासाठी नवीकोरी सायकलही भेट दिली.

Ishu | Sarkarnama

काहीतरी बनून दाखवेन

जिल्हाधिकारी सिंह यांनी ईशू खूप शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. कधीही मदत लागली तर सांग, असे म्हणत आधारही दिला. मग ईशूनेही भविष्यात शिकून काहीतरी करून दाखवेन, असा निर्धार केा.

Ishu | Sarkarnama

NEXT : कर्मचाऱ्यांसोबत महिला जिल्हाधिकाऱ्यांचे नृत्य; सोशल मीडियात व्हायरल

येथे क्लिक करा.