Rashmi Mane
शाळेत प्रवेश, सरकारी योजना असू देत प्रवास किंवा पासपोर्ट, बँक खातं उघडण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहेच पण बाळाच्या भविष्यासाठी आधार महत्त्वाचं आहे.
आधार कार्ड बाळाच्या जन्मानंतर तत्काळ बनवता येतो. 5 वर्षांपर्यंत बायोमेट्रिक माहिती लागत नाही.
5 वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट करणं बंधनकारक असतं त्यामध्ये बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन द्यावे लागतात.
बाळाचा जन्म दाखला
आई किंवा वडिलांचं आधार कार्ड
बाळाचा पासपोर्ट साइज फोटो
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://appointments.uidai.gov.in/ आणि रजिस्ट्रेशन करा.
‘Book an Appointment’ वर क्लिक करा. शहर व आधार केंद्र निवडा
बाळाची व पालकांची माहिती भरा लगेच रजिस्ट्रेशन होईल.
अपॉइंटमेंटनुसार आधार केंद्रावर जा कागदपत्रं सादर करा आणि फोटो (5 वर्षांवरील) बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करा.
14 ते 21 दिवसांत पोस्टाने किंवा ईमेलने e-Aadhaar मिळतो. UIDAI च्या वेबसाइटवरून तो डाउनलोडही करता येतो.