Rashmi Mane
जिथे जाल तिथे आधार कार्ड लागतं, असं नेहमी ऐकायला मिळतं. पण खरंच ते सगळीकडे मान्य आहे का? जाणून घ्या कुठे आधार उपयोगी ठरत नाही!
आधार कार्डवरून तुम्ही भारतीय नागरिक आहात हे सिद्ध होत नाही. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वेगळे कागदपत्र लागतात.
आधारवर जन्मतारीख असली तरी ती प्रमाण मानली जात नाही. शाळेचं दाखल पत्र, 10वी ची मार्कशीट किंवा जन्म प्रमाणपत्र हेच मान्य धरले जाते.
आधार कार्डवर तुमची जात किंवा धर्माची नोंद नसते. त्यामुळे आरक्षणासाठी किंवा शैक्षणिक/नोकरीच्या बाबतीत जात प्रमाणपत्र आवश्यक असतं.
सिम कार्ड, पॅन लिंक, पत्ता प्रमाण, शाळा अॅडमिशन, सरकारी योजना, बँकिंग सेवा, कोविड लसीकरण यासाठी आधार मान्य मानला जातो.
सरकारी स्कॉलरशिप किंवा सबसिडीसाठी केवळ आधार पुरेसा नाही. उत्पन्न प्रमाणपत्र वेगळं लागतं कारण आधारवर उत्पन्नाची नोंद नसते.