सरकारनामा ब्यूरो
संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद दुबई येथे सुरू आहे.
शिवसेना युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या परिषदेत उपस्थिती लावली.
या परिषदेत विविध प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रादरम्यान महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आदित्य यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी 'रूह'च्या अभ्यासपूर्ण सत्रांमध्ये देशातील गरजूंना पर्यावरणपूरक घरे देण्याबाबतच्या चर्चेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या परिषदेत अनेक दिग्गजांची भेट घेऊन त्यांना 'यूएन रेसटोझिरो मोहिमे'तील महाराष्ट्राच्या योगदानाबद्दल माहिती दिली.