Rajkumar Anand : आम आदमी पार्टीला आणखी झटका, मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा!

Mayur Ratnaparkhe

दिल्ली सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदासह आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

आम आदमी पार्टी सोडताना राजकुमार आनंद यांनी पक्षावरच आरोप केले आहेत.

राजकुमार आनंद दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री होते.

पटेल नगरमधून निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले होते.

अलीकडेच ईडीने राजकुमार आनंद यांच्या घरावर छापा टाकला होता.

राजकुमार आनंद यांनी 2020 मध्ये आम आदमी पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.

या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणे माझ्यासाठी अस्वस्थ झाले आहे, असं ते म्हणाले आहेत.

मी खूप व्यथित आहे आणि माझे दु:ख शेअर करत आहे, अशा शब्दांत त्यांनी भूमिका मांडली

भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला, मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. असा आरोप केला आहे.

NEXT : राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; मनसेला पहिला धक्का..!