Amol Sutar
3 जानेवारी रोजी आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे रजिस्टर पद्धतीने विवाह केला.
त्यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
काल संध्याकाळी मुंबईत आयरा आणि नुपूर या जोडप्याचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावून आयरा खान आणि नुपूर शिखरे यांना शुभेच्छा दिल्या.
आयराच्या या रिसेप्शन पार्टीत मुकेश अंबानी हे पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासोबत आयरा आणि नुपूर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली.
सुपरस्टार शाहरुख खानने त्याचा मित्र आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाच्या रिसेप्शनला त्याची पत्नी गौरी खानसोबत हजेरी लावली.
भाईजान सलमान खान याने काळ्या रंगाच्या थ्री-पीस सूटमध्ये स्वॅगने केलेली एंट्री लक्षवेधी ठरली. तर कतरिना कैफनेही रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली.
आयरा-नुपूरच्या रिसेप्शनसाठी मराठमोळे सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एकत्र पोहोचले; बॉलिवूडच्या झगमगाटात आर्ची - परशा ही चमकले.