Jagdish Patil
अमरावतीकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता लवकरच त्यांच्या सेवेत अमरावती ते मुंबई अशी विमानसेवा सुरू होत आहे.
येत्या 16 एप्रिलला बेलोरा विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरू होईल.
शुभारंभानंतर पहिले विमान सकाळी 11.30 वाजता अमरावतीहून मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे.
अलायन्स एअरने विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तर विमान सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सुरू असेल.
या विमानसेवेचे तिकिटाचे दर देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती ते मुंबई तिकीटाचे दर 2100 रुपये आहेत.
मात्र, गर्दीच्या दिवशी तिकीटाचे दर जास्त असणार आहेत. 18 एप्रिलला तिकीट दर संकेतस्थळावर 3 हजार 864 रुपये दाखवण्यात येत आहेत.
18 एप्रिलला विमान मुंबईवरुन दुपारी 2.30 वाजता अमरावतीकडे निघेल. अमरावतीला4.15 वाजता पोहोचेल.
तर अमरावतीवरुन दुपारी 4.40 वाजता विमान निघेल आणि सायंकाळी 6.25 वाजता मुंबईत पोहोचेल, असं वेळापत्रक असणार आहे.