Rutuja Patil: जय पवार यांच्याशी साखरपुडा झालेल्या ऋतुजा पाटील स्वत: आहे 'या' मॉलच्या संचालिका...

Deepak Kulkarni

खासदार सुळेंकडून सर्वात पहिल्यांदा माहिती...

काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी ऋतुजा पाटील या पवार कुटुंबाची सून होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती.

Rutuja Patil | Sarkarnama

साखरपुड्याचा सोहळा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुड्याचा सोहळा गुरुवारी (ता.11) घोटावडे येथील फार्म हाऊसवर विशेष निमंत्रितांंच्या उपस्थितीत पार पडला.

Jay Pawar And Rutuja Patil | Sarkarnama

आकर्षक विद्युत रोषणाई,नयनरम्य सजावट

आकर्षक विद्युत रोषणाई,नयनरम्य सजावट मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अगदी पारंपारिक पध्दतीनं अजित पवारांच्या फार्महाऊसवर सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Jay Pawar And Rutuja Patil | Sarkarnama

साखरपुड्याची चर्चा...

जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून अखेर त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या दृष्टीनं पुढं पाऊल टाकलं आहे.

Jay Pawar And Rutuja Patil | Sarkarnama

फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या या साखरपुडा सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

jay-pawar-engagement-8.jpg | Sarkarnama

सहकारमहर्षी हणमंतराव पवार यांची नात

ऋतुजा या फलटण येथील सहकारमहर्षी हणमंतराव पवार यांची नात, तर प्रवीण पाटील आणि पल्लवी पाटील यांची ऋतुजा पाटील ही कन्या आहे. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात.

jay pawar | Sarkarnama

प्रवीण पाटलांची ओळख

तसेच ऋतुजा पाटील यांचे वडील आयडिया या टेलिकॉम कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांंनी स्वतःचा 'जायंट सायकल' म्हणून सायकल मॅन्युफॅक्चरिंग ब्रँडची सुरूवात केली. मल्टिनॅशनल कंपन्यांंचे कन्सल्टन्ट म्हणून जबाबदारी पार पडत आहेत.

jay pawar And Rutuja Patil | Sarkarnama

श्रीराम बाजार या मॉलच्या संचालिका

राजकारणापासून काहीसे अलिप्त राहणारे जय पवार यांना उद्योगक्षेत्राची विशेष आवड आहे. काही वर्षे त्यांनी दुबईत व्यवसाय केल्याचेही बोलले जाते. तर ऋतुजा याही फलटण येथील श्रीराम बाजार या किराणाशी संबंधित मॉलच्या सध्या संचालिका आहेत.

jay pawar And Rutuja Patil | Sarkarnama

संपूर्ण पवार कुटुंबाची हजेरी...

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी पवार कुटुंबातील सगळ्याच सदस्यांनी आवर्जून हजेरी लावली होती.

jay pawar And Rutuja Patil Engagement | Sarkarnama

NEXT : राजकीय नेते आहेत फास्टफूड प्रेमी; मोदींना ढोकळा तर... शिंदेंना आवडतो वडापाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian food and politics | SARKARNAMA
येथे क्लिक करा...