Rashmi Mane
टीव्ही अभिनेत्री आणि आम आदमी पार्टीच्या नेत्या अभिनेत्री चाहत पांडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
यावेळी राजकारणातील डावपेचामुळे नाही तर त्या 'बिग बॉस 18'मध्ये एन्ट्री करू शकतात अशा बातम्यांमुळे चर्चाचा विषय बनल्या आहेत.
सलमान खानचा लोकप्रिय 'रिॲलिटी शो बिग बॉस' हा नेहमीच वादांमुळे चर्चेत असतो. सध्या बिग बॉस 18 ची चर्चाही जोर धरू लागली आहे.
5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या शोच्या (बिग बॉस 18 स्पर्धक) स्पर्धकांची नावे दररोज समोर येत आहेत. आता त्यात 'आप' नेत्या चाहत पांडे या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.
'आप'च्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेल्या टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे बिग बॉस 18 मध्ये दिसू शकते, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. परंतु अजूनही शोच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणतेही अपडेट आलेले नाही.
चाहत पांडे यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या या निवडणुकीत पराभूत झाल्या. या जागेवर भाजपचे नेते विजयी झाले होते.
2020 मध्ये चाहत आणि तिच्या आईला दमोह पोलिसांनी अटक केली होती. वास्तविक, चाहत आणि तिच्या आईवर त्यांच्या मामाच्या घराची तोडफोड आणि मारहाण केल्याचा आरोप होता.
चाहत पांडे यांनी 'पवित्र बंधन' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ती 'द्वारकाधीश', 'तेनालीराम', 'राधा कृष्ण', 'सावधान इंडिया', 'नागिन-2', 'क्राइम पेट्रोल' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसल्या आहेत.