Rajanand More
आम आदमी पक्षाचे दिल्लीतील ओखला मतदारसंघाचे आमदार असून पक्षाचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
ईडीने सोमवारी सकाळी त्यांच्या घरी धाड टाकली होती. चार तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
खान 2016 मध्ये वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी 32 पदांवर बेकायदेशीर भरती, तसेच संपत्ती भाडेतत्वावर देताना अनियमितता केल्याचे आरोप आहेत.
ईडीच्या पाच हजार पानांच्या चार्जशीटमध्ये खान यांचे नाव आहे. त्यांनी अज्ञात स्त्रोतांच्या माध्यमातून संपत्ती जमा केल्याचा, जमीन खरेदी-विक्रीत घोटाळ्याचा आणि मनी लाँर्डिंगचा आरोप आहे.
अमानतुल्लाह खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झाला. मात्र, त्यांनी आपला दबदबा दिल्लीत निर्माण केला. ओखला मतदारसंघासह दिल्लीत मुस्लिमांमध्ये मोठे नाव.
ओखला विधानसभा मतदारसंघातच शाहीनबाग आहे. याठिकाणी सीएए म्हणजेत नागरिकता संशोधन कायद्याविरोधात अनेक दिवस आंदोलन सुरू होते. यामध्येही खान यांची महत्वाची भूमिका होती.
मुस्लिमांच्या मतदानावरच विजयाचे समीकरण अवलंबून असते. त्यामुळेच खान हे 2015 आणि 2020 असे दोनदा आमदार बनले. खान हे आपचा मुस्लिम चेहरा असून त्यांच्या अटकेमुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे.
आमदार झाल्यानंतर दोनदा जेलची वारी. एका महिलेला धमकावल्याप्रकरणी आणि मेव्हण्याच्या पत्नीच्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर खान यांना अटक करण्यात आली होती.
सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि अरविंद केजरीवाल यांच्यानंतर खान हे आपचे तिहारमध्ये जाणारे पाचवे बडे नेते ठरणार आहेत.