Mayur Ratnaparkhe
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढत आहेत.
फरार गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याचाही अमानतुल्ला खान यांच्यावर आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी केला अमानतुल्ला खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तेव्हापासून पोलिस त्यांना अटक करण्यासाठी सतत छापे टाकत आहेत.
गर्दी जमवून आणि बेकायदेशीर बैठकीत सहभागी होऊन वातावरण बिघडवल्याचाही आरोप आहे.
अमानतुल्ला खान यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणला होता.
पोलिसांनी अमानतुल्ला खान आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
आम आमदी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांना कधीही अटक केली जाऊ शकते.
अमानतुल्ला खानला यांच्या शोधात पोलिस विविध ठिकाणी शोध घेत आहेत.