Roshan More
आतिशी यांनी आज (शनिवारी) दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अतिशी यांनी केजरीवाल यांचा दिल्लीचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मोडला आहे. अतिशी 43 वर्षांचे आहेत. तर केजरीवाल 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा 45 वर्षांचे होते.
सौरभ भारद्वाज यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये ते आरोग्य, शहरी विकास, पर्यटन-कला संस्कृती भाषा, उद्योग, पाटबंधारे आणि पूर नियंत्रण मंत्री होते.
कैलाश गेहलोत दिल्ली देहाटच्या नजफगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये त्यांनी वाहतूक, महसूल मंत्री होते. त्यांनी देखील आतिशी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री पदाची शपथ घेतली.
गोपाल राय
गोपाल राय हे आम आदमी पार्टीचे दिल्ली प्रभारी आहेत. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये देखील ते मंत्री होते. त्यांनी आतिशी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे.
इम्रान हुसेन हे यापूर्वी देखील अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ते अन्न व नागरी पुरवठा आणि निवडणूक मंत्री होते. ते आतिशी यांच्या मंत्रिमंडळात आहेत.
दलित नेते मुकेश अहलावत हे दिल्लीतील सुलतानपूर माजरा येथून आमदार आहेत. मुकेश हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.