‘आप’ खासदारांच्या बंडानंतर काही तासांतच 'या' स्टार खेळाडूने हाती घेतला 'झाडू'

Rajanand More

खासदारांचे बंड

आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी बंद करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षासह संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

Raghav Chadha Removed | AAP Politics | Sarkarnama

पंजाबचे खासदार

बंड केलेल्या सात खासदारांपैकी राघव चड्ढा यांच्यासह सहा खासदार पंजाबमधून निवडून गेले आहे. त्यामुळे पंजाबसाठीही हा मोठा धक्का होता.

Raghav Chadha | Sarkarnama

पाला जलालपुरिया

खासदारांनी २४ एप्रिलला बंड केल्यानंतर काही तासांत दुसऱ्याच दिवशी स्टार कबड्डीपटू पाला जलालपुरिया याने आपमध्ये प्रवेश केला आहे. आपसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Pala Jalalpuria with Bhagwant Mann | Sarkarnama

क्लोज फायटर

कबड्डीमध्ये क्लोज फायटर म्हणून पाला याची ओळख आहे. स्टॉपर म्हणून त्याने कबड्डीत केलेल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला आहे.

Pala Jalalpuria | Sarkarnama

पंजाबमध्ये लोकप्रिय

पाला जलालपुरिया हा पंजाबमधील तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तसेच खेळाडूंमध्येही त्याची लोकप्रियता वरच्या स्थानावर आहे.

Pala Jalalpuria | Sarkarnama

'आप'ला फायदा

खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पालाचा पक्षप्रवेश आपसाठी महत्वाचा मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पाला याला उमेदवारी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

Pala Jalalpuria with Bhagwant Mann | Sarkarnama

मुख्यमंत्री सक्रीय

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पाल जलालपुरिया याचे पक्षात स्वागत केले. विशेष म्हणजे माजी क्रिकेटपटू खासदार हरभजन सिंग यांना आपमध्ये आणण्यात मान यांचीच भूमिका महत्वाची होती.

Pala Jalalpuria | Sarkarnama

आनंद व्यक्त

जलालपुरियाच्या पक्षप्रवेशानंतर मान यांनी आनंद व्यक्त केला. त्याच्यामुळे पक्षाची ताकद वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार नेहमीच खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी कटिबध्द असल्याचे मान म्हणाले.

Bhagwant mann | Sarkarnama

NEXT : दुखावलेल्या लेकीनं थेट वडिलांच्या राजकारणालाच दिलं आव्हान; ही वाघीण भल्याभल्यांचा खेळ बिघडवणार

येथे क्लिक करा.