दुखावलेल्या लेकीनं थेट वडिलांच्या राजकारणालाच दिलं आव्हान; ही वाघीण भल्याभल्यांचा खेळ बिघवणार

Rajanand More

के. कविता

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या माजी आमदार के. कविता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

K Kavitha | Sarkarnama

नवा पक्ष

के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा असून ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ (TRS) हे नाव पक्षाला दिले आहे. त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.

K Kavitha | Sarkarnama

वडिलांना आव्हान

पक्षाच्या नावातूनच कविता यांनी थेट आपल्या वडिलांच्या राजकीय साम्राज्यालाच आव्हान दिले आहे. पक्षाच्या घोषणेवेळी त्यांनी तसे संकेतही दिले.

KCR | Sarkarnama

बीआरएस

केसीआर यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती (BRS) असे आहे. कविता यांनी त्यातील भारत या शब्दाऐवजी तेलंगणा हा शब्द वापरून अस्मितेचा भावनिक डाव टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.   

K Kavitha | Sarkarnama

वडिलांवर टीका

पक्षस्थापनेवेळी कविता यांनी बीआरएस पुढील हजार वर्षे बदलू शकत नाही, अशी टीका केली. तसेच वडिलांवरही निशाणा साधला. काँग्रेस सरकारलाही धारेवर धरले.

K Kavitha | Sarkarnama

हकालपट्टी

कविता यांच्याकडून पक्षातील अंतर्गत धोरणांवर टीका केली होती. त्यातून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

K Kavitha | Sarkarnama

मद्य धोरण घोटाळा

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी के. कविता या काही महिने तुरुंगात होत्या. त्यावरूनही बीआरएसमध्ये कलह निर्माण झाला होता.

K. Kavitha | Sarkarnama

निर्दोष मुक्तता

दिल्लीतील स्थानिक कोर्टाने या प्रकरणातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह के. कविता तसेच सर्व २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

K Kavitha | Sarkarnama

NEXT : अर्थसंकल्पातील एका घोषणेमुळे दिला मंत्रिपदाचा राजीनामा, आता मोदींकडून मोठी जबाबदारी; कोण आहे हा नेता?

येथे क्लिक करा.