'आप' मधून भाजपमध्ये आलेल्या 7 खासदारांमध्ये सर्वात गरीब कोण? पाहा कुणाची किती संपत्ती..

Ganesh Sonawane

आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. आप'चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी राघव चड्डा यांच्यासह तब्बल सात खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

AAP Split | Sarkarnama

1. राजिंदर गुप्ता

राजिंदर गुप्ता हे ट्रायडेंट (Trident) ग्रुपचे मालक आहेत. ते या सात खासदारांमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जातात. उपलब्ध माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे दहा हजार कोटी रुपये आहे. त्यांनी 2025 च्या प्रतिज्ञापत्रात पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जाहीर केली आहे.

Rajinder Gupta | Sarkarnama

2. विक्रम साहनी

प्रख्यात उद्योगपती विक्रम साहनी यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 498 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रावर त्यांचा फोकस असून या क्षेत्रांमधूनच त्यांना मोठे उत्पन्न मिळते.

Vikram Sahani | Sarkarnama

3. अशोक मित्तल

मित्तल हे LPU चे संस्थापक म्हणून ओळखले जातात. ADR नुसार, त्यांच्याकडे 91 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता आहे. तर काही स्रोतांनुसार त्यांची एकूण संपत्ती 800 कोटी रुपये आहे

Ashok Mittal | Sarkarnama

4. हरभजन सिंह

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने 2022 च्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान आपली 82 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली. त्याचे उत्पन्न प्रामुख्याने क्रिकेट कमेंट्री, बँड एंडोर्समेंट आणि BCCI पेन्शनमधून येते.

Harbhajan Singh | Sarkarnama

5. संदीप पाठक

IIT दिल्लीचे माजी प्राध्यापक आणि 'आप'चे चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जात ते संदीप पाठक यांनी अंदाजे एकूण 4 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

Sandeep Pathak | Sarkarnama

6. राघव चड्डा

राघव चड्डा यांनी 2022 मध्ये अंदाजे 36 लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली, तर त्यांची एकूण अंदाजित संपत्ती सुमारे 50 लाख रुपये आहे.

Raghav Chadha | Sarkarnama

7. स्वाती मालीवाल

मालीवाल यांचा प्रवास हा एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सुरू झाला होता तो आता एक खासदारांपर्यंत पोहचला आहे. त्यांची संपत्ती अंदाजे 19 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.

AAP Swati Maliwal | Sarkarnama

NEXT : 'ED' छापा ते भाजप प्रवेश! दहा दिवसांत गेम पलटला; अशोक मित्तल यांचा राजकीय थरार...

Ashok Mittal BJP | Sarkarnama
येथे क्लिक करा