Pradeep Pendhare
खासदार राघव चड्ढा यांना 'आप'च्या राज्यसभा खासदारांच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर तिथं अशोक मित्तल यांची नियुक्ती केली.
अवघ्या 10 दिवसांपूर्वीच 'ईडी'च्या पथकांने पंजाबमधील जालंधर आणि गुरुग्राम इथल्या खासदार अशोक मित्तल यांच्या अनेक निवासस्थानांवर एकाच वेळी छापे घातले.
हे छापे प्रकरण कथित लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधील निधी आणि परदेशी गुंतवणुकीशी संबंधित संशयास्पद हालचालींशी निगडित असल्याचे सांगितले जाते.
'ईडी' पथकांनी पंजाबमधील जालंधर आणि हरियाणातील गुरुग्राम इथं सुमारे आठ ते नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते.
'ईडी'ची कारवाई केवळ अशोक मित्तल यांच्यापुरती मर्यादित नव्हती. तपास यंत्रणेने खासदाराच्या मुलाच्या विविध निवासस्थानांवरही छापे टाकले आहेत.
10 सप्टेंबर 1964 रोजी पंजाबमधील जालंधर इथं जन्मलेल्या अशोक मित्तल यांनी कायद्याची पदवी पूर्ण केली असून, त्यांनी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीची स्थापना केली.
देशातील सर्वात मोठ्या खासगी विद्यापीठांपैकी एक आहे. अशोक मित्तल आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून आले.
अशोक मित्तल यांनी 'आप'कडून खासदार म्हणून परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि वित्त समित्यांवर काम केलं आहे.
अशोक मित्तल हे पंजाबमधील प्रभावशाली आणि श्रीमंत नेत्यांपैकी एक असून, निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची 91 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची एकूण मालमत्ता जाहीर केली आहे.