Sachin Waghmare
राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत असतात.
एरवी सामाजिक उपक्रम राबवण्याचे ढोल बडवणारे सत्तार चर्चेत आले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली त्यांनी गौतमी पाटीलच्या नाच-गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.
हुल्लडबाजी करणाऱ्या गर्दीला आवरण्यासाठी सत्तार आणि त्यांची पुत्र समीर या दोघांनी अर्वाच्च भाषा वापरली.
सत्तार यांनी यावेळी शिवीगाळ करत आपल्याच असंस्कृतपणाचे प्रदर्शन जाहीरपणे घडवले.
बेताल बडबड ही अब्दुल सत्तार यांच्यासाठी नवी नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयीही आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता.
पाहणी दौरा आटोपून आल्यानंतर एका जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतानाही त्यांनी वादग्रस्त भाषेचा वापर केला होता.
संजय राऊत यांच्यावर केली होती शेलक्या शब्दांत टीका