Roshan More
गेल्या वर्षी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. यंदा देखील भारत जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. मात्र, या पदयात्रेचे नाव 'भारत जोडो न्याय यात्रा' असेल.
यात्रेची सुरुवात 14 जानेवारीला मणिपूर राज्यातून होईल. तब्बल 15 राज्यातून ही यात्रा जाईल.
मणिपूरमधील इम्फाळ येथून ही यात्रा सुरू होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी तब्बल 6 हजार 700 किलोमीटरचा प्रवास करतील.
गेल्या वर्षी काढलेल्या यात्रेमुळे काँग्रेसला कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमुळे सत्ता मिळण्यास मदत झाली. मात्र, हिंदी भाषिक पट्ट्यात यात्रेचा प्रभाव जाणवला नाही.
भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर, मेघालय, नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा या राज्यातून यात्रा जाणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रा हिंदी भाषिक राज्यातून जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.
15 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा प्रवास करणार आहे.
67 दिवसांच्या न्याय यात्रेचा समारोप मार्च महिन्यात मुंबईत होईल.