ABHA Card : फक्त रुग्णालयातच नाही, ABHA कार्ड घरबसल्या देते फायदे; एक स्मार्ट आरोग्य ओळख!

Rashmi Mane

ABHA कार्ड म्हणजे काय?

ABHA म्हणजे 'आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. तुमचा डिजिटल हेल्थ ID कार्ड. यात तुमचा संपूर्ण मेडिकल इतिहास सुरक्षित राहतो.

ABHA Health ID Card | Sarkarnama

ABHA कार्ड कोण बनवू शकतो?

कोणताही भारतीय नागरिक ABHA कार्ड बनवू शकतो. यासाठी वय, उत्पन्न किंवा कोणतीही मर्यादा नाही.

ABHA Health ID Card | Sarkarnama

ABHA आणि आयुष्मान कार्ड यामधील फरक

ABHA कार्ड: डिजिटल मेडिकल डेटा साठवण्यासाठी.

आयुष्मान कार्ड: गरीब नागरिकांसाठी मोफत उपचारासाठी विमा सुविधा.

ABHA Health ID Card | Sarkarnama

ABHA कार्डचे फायदे

  • जुने रिपोर्ट्स बरोबर नेण्याची गरज नाही.

  • सर्व मेडिकल माहिती एकाच ठिकाणी.

  • डॉक्टर आणि हॉस्पिटलसोबत डेटा शेअर करता येतो.

ABHA Health ID Card | Sarkarnama

डेटा सुरक्षितता कशी राखली जाते?

  • OTP द्वारे अ‍ॅक्सेस

  • तुमच्या संमतीशिवाय कोणीही डेटा पाहू शकत नाही

  • QR कोड स्कॅन करूनही माहिती पाहता येते

ABHA Health ID Card | Sarkarnama

ABHA कार्ड कुठे वापरता येईल?

  • सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये

  • डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये

  • टेलीमेडिसीन व ऑनलाइन औषध सेवांसाठी

ABHA Health ID Card | Sarkarnama

कार्डसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार किंवा वोटर ID

  • मोबाइल नंबर (आधारशी लिंक असलेला)

  • पासपोर्ट साइज फोटो

  • पत्ता पुरावा (बँक पासबुक, रेशन कार्ड

ABHA Health ID Card | Sarkarnama

ABHA कार्ड ऑनलाइन कसे बनवायचे?

  1. https://healthid.ndhm.gov.in या वेबसाइटवर जा.

  2. ‘Create ABHA Number’ वर क्लिक करा.

  3. Aadhaar / Driving License वापरून OTP टाका.

  4. फॉर्म भरा, फोटो अपलोड करा.

  5. कार्ड डाउनलोड करा.

ABHA Health ID Card | Sarkarnama

Next : पुणे रेल्वे स्थानकाची शतकी कहाणी: इतिहास अन् वारसा 

येथे क्लिक करा