Pune Railway station : पुणे रेल्वे स्थानकाची शतकाची कहाणी: इतिहास अन् वारसा

Rashmi Mane

100 वर्षांचा गौरवशाली इतिहास

पुणे स्थानक मध्य रेल्वेचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. देशभरातील शहरांना जोडणारे हे स्थानक आता 100 वर्षात पदार्पण करत आहे.

Pune Railway station | Sarkarnama

नामांतर

यातच आता पुणे रेल्वे स्थानकाचं नाव थोरले बाजीराव पेशवे करण्यात यावं, अशी मागणी भाजपच्या महिला खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

Medha Kulkarni | Sarkarnama

पुणे स्थानकाचा इतिहास

पुणे स्थानकाचे पहिले डिझाईन 1915 मध्ये तयार झाले. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 1922 मध्ये काम सुरू होऊन 1925 मध्ये पूर्ण झाले.

Pune Railway station | Sarkarnama

उद्घाटनाचा ऐतिहासिक दिवस

27 जुलै 1925 रोजी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

Pune Railway station | Sarkarnama

रेल्वे कंपनीचा सहभाग

लंडनमधील GIP रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला. ब्रिटिश लष्कराच्या दृष्टीने पुणे हे महत्त्वाचे केंद्र होते.

Pune Railway station | Sarkarnama

हेरिटेज दर्जा

पुणे रेल्वे स्थानकाला हेरिटेज दर्जा देण्यात आला आहे. तसेच मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणूनही गौरव प्राप्त झाला आहे.

Pune Railway station | Sarkarnama

वाढती वर्दळ आणि अपुरी यंत्रणा

आज या स्थानकातून 275+ गाड्या धावत असून लाखो प्रवासी दररोज ये-जा करतात. तरीही 6 प्लॅटफॉर्म अपुरे पडत आहेत.

Pune Railway station | Sarkarnama

सुरक्षा व सुविधांची गरज

स्थानकाच्या आवारातील वाहतूक, पार्किंग, सुरक्षा व अनधिकृत प्रवेश ही मोठी आव्हाने ठरत आहेत. आधुनिक सुविधांची नितांत गरज आहे.

Pune Railway station | Sarkarnama

Next : पृथ्वीच्या पोटात घुसून स्फोट करणारा 'बंकर बस्टर' बॉम्ब; जमिनीखाली घुसून करते थेट विस्फोट! 

येथे क्लिक करा