Mayur Ratnaparkhe
बिग बॉस फेम डॉ. अभिजित बिचुकले यांनीही सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे.
देशाचे संविधान वाचविण्यासाठी आपण ही लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अभिजित बिचुकले यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.
सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क देणारे संविधान बदलण्याचा घाट काही पक्षांनी घेतली आहे, असं बिचुकलेंनी म्हटलं आहे.
हे संविधान वाचविण्यासाठी व सर्वसामान्यांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपण लोकसभेची निवडणूक लढणार आहोत. असं ते म्हणत आहेत.
मी यापूर्वी 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा चारवेळा सातारा लोकसभेची निवडणूक लढली व माझे अस्तित्व दाखवून दिले. असंही त्यांनी सांगितलं आहे.
सातारच्या जनतेने 2009 मध्ये मला 12 हजार 662 मतदान दिले होते. आता याची संख्या विजयाच्या मतांमध्ये झाली पाहिजे, असे मला वाटते. असं बिचुकलेंनी सांगितलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार म्हणून आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी पुढे जात आहोत. अशा शब्दातं बिचुकलेंनी भूमिका मांडली आहे.
सातारा लोकसभेसाठी दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, त्यांच्या विरोधात कवीमनाचे नेते व डॉ. अभिजित बिचुकले हेही असणार आहेत.